आठवणीतली शाळा!
नमस्कार, मी जाई पवार रणधीर, ( पावाधीर)
आज थोडा माझ्या शिक्षणा बद्दल सांगते, मी सर्वात पहिल्यांदा सुमंगल मॉंटेसरी मध्ये होती जिथे इंग्लिश आणि मराठी मध्यम ची मुले होती, पण घरच्या ना वाटलं कि मराठी मध्यम मध्ये मला घालायला पाहिजे म्हणून मी मराठी माध्यम मध्ये, बाजूचा फोटो तिथल्या वेशभूषा स्पर्धेतील आहे .. मी कोळी बाई नाही बाबा झाले होते, आई काकू आणि आत्या ह्यांनी मिळून तयारी केली असा मला पुसट पुसट आठवत... !
शाळेच्या खूप आठवणी आहेत..पण लिहीत बसला तर एवढा आहे लिहायला काय काय सांगू..
नंतर पाचवी ते दहावी मी RJCB Girls High School मध्ये शाळा मराठी जरी असली तरी नाव मुद्दाम इंग्लिश मध्ये लिहिला आहे ..! कारण शाळेने मातृभाषेसोबत वाघिणीचे ( इंग्लिशभाषेचा) बाळकडू पाजला आहे.
आज मी जी काही आहे आणि जी होणार आहे त्यात शाळेचा मोठा वाटा आहे. मला तर मनापासून वाटतं कि मराठी शाळा तळ हाताच्या फोडा प्रमाणे जपला पाहिजे!
आज साठी येवढाच भेटूया पुढच्या लेखात!
तो पर्यंत "तुमचा आमचा अन्नदाता सुखी भव:".
Comments
Post a Comment